18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रईडीची अवस्था चलान देणा-याप्रमाणे

ईडीची अवस्था चलान देणा-याप्रमाणे

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. आज रस्त्यावर चलान काटणा-या प्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच सीबीआय आणि ईडीच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे या सोमवार दि. २० सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये आल्या असता, मीडियाशी संवाद साधला. सुळे यांनी थेट ईडीकडून होणा-या कारवायांवर टीका केली. मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. पण आज रस्त्यावर चलान कापणा-याप्रमाणे ईडीची अवस्था करण्यात आली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. खोटेनाटे आरोप केल्यास त्यांचे कुटुंब कुठल्या अवस्थेतून जातात याचा विचार केला पाहिजे.

तत्त्वाची लढाई आणि विरोध झाला पाहिजे. पण इतकी टोकाची कटुता निर्माण होता कामा नये. नोटीस दाखवा. रेड करा आमचे काहीही म्हणणे नाही, असे सांगतानाच आमच्या अनिल देशमुख यांच्यावर सात वेळा रेड पडली. इतक्या रेड असतात का? ईडी, सीबीआय सध्या एजन्सी नाहीत. त्यांच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला. माणूस आमच्याकडे असला की देशद्रोही आणि त्यांच्याकडे असला की धुवून निघतो, असा चिमटाही त्यांनी काढला.

त्यांना कसे माहीत पडते?
ईडी कुणाला अटक करणार हे यांना कसे माहीत पडते? हे कोणत्या आधाराने बोलातात? हे काय सीपी किंवा आयजी आहेत की ईडीचे अध्यक्ष आहेत का? मग हे कसं बोलतात?, असा सवाल करतानाच पाच दशकात आमच्यावरही आरोप झाले. पण आमची तयारी आहे. इतकी कटुता येणे योग्य नाही. आमच्या विरोधात ट्रक भर पुरावे आणले पण काय झाले? असा सवालही त्यांनी केला. प्रेस हाऊसवर सुद्धा रेड होते. त्यांना नोटीस दिली जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या