मुंबई : शेअर बाजारातील चढ-उताराचा खेळ सुरूच असून बुधवारच्या घसरणीनंतर आज पुन्हा शेअर बाजार वधारला आहे. शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४८८ अंकांची वाढ झाली
तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १६२ अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये आज ०.९४ टक्क्याची वाढ होऊन तो ५२,३११ अंकावर स्थिरावला, तर निफ्टीमध्ये १.०६ टक्क्यांची वाढ होऊन तो १५,५७६ अंकावर पोहोचला.