35.2 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रशेअर बाजार गडगडला; गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका

शेअर बाजार गडगडला; गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका

एकमत ऑनलाईन

मुंबई : शेअर बाजारात सध्या मोठी पडझड झाली आहे. चौफेर विक्रीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७५० अंकांनी गडगडला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४३ अंकांनी घसरला आहे. या पडझडीत गुंतवणूकदारांचे सुमारे दोन लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

आज सकाळपासून बाजारावर नकारात्मक वातावरणाचा प्रभाव होता. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली होती. अमेरिकेतील निवडणूक, कोरोनाचे नुकसान आणि अर्थव्यवस्थेला होणारी मदत याचे पडसाद भांडवली बाजारावर उमटले. सिंगापूरसह प्रमुख शेअर बाजारांत आज घसरण झाली. तो पाहून भारतीय बाजारात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरू केला. सध्या सेन्सेक्स ७४३ अंकांनी कोसळला असून तो ३८१०२ अंकांवर ट्रेड करत आहे.

निफ्टी २४३ अंकांनी घसरला असून तो ११२६१ अंकावर आहे.सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २७ शेअर घसरणीसह बंद झाले, तर इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक आणि टीसीएस या शेअरमध्ये वाढ झाली. वित्त सेवा क्षेत्रात एडलवाइज फायनान्शिअल, इंडियाबुल्स हौसिंग, मुथूट फायनान्स, श्रीराम सिटी युनियन, आदित्य बिर्ला कॅपिटल, हुडको आदी महत्वाचे शेअर घसरले आहेत. त्याशिवाय आजच्या पडझडीत स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्यांनादेखील जबर फटका बसला आहे.

‘संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न-कंगना राणौत

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या