34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रइंजिनिअरिंगचा अभ्यास आता मराठीतही उपलब्ध होणार

इंजिनिअरिंगचा अभ्यास आता मराठीतही उपलब्ध होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित ठेवू नये. ते ३६५ दिवस चालू ठेवणे आवश्यक आहे, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ग्रंथालय संचालनालय आयोजित प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष आणि मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमावेळी त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले.

मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा असून आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. मराठी भाषा दिन देशभरासह जगभरात साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक असून यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

विद्यार्थ्यांना अधिक फायदा
पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषेतही उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत तंत्र शिक्षण घेण्यास मदत आणि त्या विषयाची समज अधिक स्पष्ट होण्यास, मदत होईल असेही उदय सामंत यांनी सांगितले.

मराठी विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत राहण्याची व्यवस्था
दिल्लीत मराठी विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देणाºया नूतन विद्यालयाच्या विकास आणि नूतनीकरणाच्या कामासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाºया मराठी विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. प्रबोधन पाक्षिकाचे शताब्दी वर्ष आपण साजरे करतोय, ही निश्चितपणे आनंदाची बाब आहे. राज्यामध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरूवात प्रबोधनकार ठाकरे यांनी केली. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे स्थान हे अनन्यसाधारण असून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हेच खºया अर्थाने त्यांचे स्मरण असेल. असेही उदय सामंत म्हणाले.

रुग्णसंख्या वाढल्यास लॉकडाऊन निश्चित: देसाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या