24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रपुुढील महिन्यापर्यंत ऊस गाळप हंगाम राहणार

पुुढील महिन्यापर्यंत ऊस गाळप हंगाम राहणार

एकमत ऑनलाईन

पुणे : उसाअभावी राज्यातील ४० साखर कारखाने बंद झाले आहेत तर साखर उत्पादन १२३५.६१ लाख टन इतके झाले आहे आणि १०.४२ टक्के इतका साखर ऊतारा मिळाला आहे. ऊसाची उपलब्धता लक्षात घेता पुढील महिन्यापर्यंत उस गळप हंगाम सुरू राहण्याचा अंदाज आहे.

आजवर राज्यात ११८५ लाख मे टन इतके उसाचे गाळप पूर्ण झाले आहे आणि कोल्हापूर विभागातील सर्वाधिक कारखाने म्हणजेच बंद झालेले कारखाने २८ आहेत त्यानंतर सोलापूर विभागातील ८ कारखाने तर नगर विभागात २ आणि नागपुर आणि औरंगाबाद विभागात बंद झालेला प्रत्येकी १ कारखाना आहे. तर सर्वाधिक साखर ऊतारा हा कोल्हापूर विभागात ११.७८ टक्के इतका आहे. अशी माहिती साखर आयुक्तालायाकडून सांगण्यात आली.

यावर्षी अतिरिक्त पावसामुळे ऊसाच्या उत्पादनात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे परिणामी साखर उत्पादन विक्रमी होणार आहे .पण नेमके किती उत्पादन वाढणार याबाबत अजून अंदाज आला नाही त्यामुळे यंदा अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे दिसते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या