दिल्ली / मुंबई : अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्ही संपादक अर्णव गोस्वामी यांना आणि अभिनेत्री कंगना रानावत हिला शुक्रवारी बॉम्बे उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून, दोन्ही प्रकरणात सर्वोच्च आणि बॉम्बे उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
कंगना रानावतच्या आॅफिसचा काही भाग बीएमसीने अवैध असल्याचे सांगितले होते. ९ सप्टेंबरला तिचे आॅफिस तोडण्यात आले होते. याचा विरोध करत कंगनाने कायद्याचा आधार घेतला होता. याप्रकरणी बॉम्बे उच्च न्यायालयाने कंगनाच्या पक्षात आपला निर्णय दिला. न्यायालयाने बीएमसी कारवाई अवैध असल्याचे म्हटले आहे
कारवाई अवैध
कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई अवैध असून महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यासोबत कंगनाची वास्तू नवीन नाही, जुनीच आहे. पालिकेने केलेली कारवाई चुकीची आहे. महापालिकेने ७ आणि ९ सप्टेंबर रोजी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
कंगनाचा दावा पडताळणार
कंगनाने हायकोर्टात कार्यालयाचे २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला होता. यावर उच्च न्यायालयाने कार्यालयाच्या झालेल्या नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी निरीक्षकाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. मार्च २०२१ पर्यंत या निरीक्षकांना उच्च न्यायालयाला अहवाल द्यावा लागणार आहे.
कंगनालाही न्यायालयाने खडसावले
याचिकाकर्त्या कंगना रानावतने सोशल मीडियावर मत व्यक्त करताना काळजी घ्यायला हवा, असा सल्ला कोर्टाने दिला. तिने केलेल्या ट्विट किंवा वक्तव्यांवर न्यायालय सहमत नाही. पण एखाद्या व्यक्तीने कितीही अयोग्य मते व्यक्त केली, तरी शासन पूर्वग्रह ठेवून अशा व्यक्तींवर कारवाई करू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हा लोकशाहीचा विजय : कंगना
या निर्णयामुळे कंगना आनंदी झाली आहे. ट्विटरवरून तिने हा आनंद व्यक्त केला आहे़ जेव्हा एखादी व्यक्ती सरकार विरोधात उभी राहते आणि जिंकते तेव्हा हा एका व्यक्तीचा विजय नसतो. तो लोकशाहीचा विजय असतो. तुम्हा सर्वांचे धन्यवाद ज्यांनी मला हिंमत दिली आणि त्या लोकांचे धन्यवाद जे माझ्या तुटलेल्या स्वप्नांवर हसले. तुम्ही खलनायकाची भूमिका निभावण्याचे एक कारण आहे की, मी हिरोची भूमिका साकारू शकेन.
आता न्यायालयालासुद्धा महाराष्ट्रद्रोही ठरविणार का? – फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल
महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. ठाकरे सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर विरोधक नाराजी व्यक्त करत असून टीका करत आहेत. दरम्यान शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. एकाच दिवशी आलेले निकाल सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत, असे ते म्हणाले आहेत. त्यांनाही महाराष्ट्रद्रोही ठरवणार का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
शेतक-यांना डांबण्यासाठी स्टेडियम नाही