24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रराज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के

राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९६. ९४ जाहीर झाला आहे तर राज्यातील २९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे अशी माहिती राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकारांना सांगितली. तसेच एकूण नऊ विभागातील कोकण विभागाची निकालाची टक्केवारी सर्वाधिक आहे तर नाशिक विभागाची टक्केवारी सर्वात कमी आहे असे ते म्हणाले.

परीक्षेसाठी एकूण नऊ विभागातून १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले त्यातील १५ लाख २१ हजार ००३ विद्यार्थी पास झाले आहेत असे नमूद करून ते म्हणाले , राज्यात मुलींच्या पास होण्याचे प्रमाण हे मुलांपेक्षा १ .९० टक्के अधिक आहे .निकालामध्ये मुलींचे पास होण्याचे प्रमाण ९७ . ९६ टक्के तर मुलांचे प्रमाण ९६ . ०६ टक्के आहे त्याचप्रमाणे राज्यात परीक्षेसाठी ८०२९ दिव्यांग परीक्षेसाठी बसले त्यामध्ये ७५७९ विद्यार्थी पास झाले आहेत . त्याची टक्केवारी ९४ .४० टक्के आहे त्याचप्रमाणे २४ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे तर राज्यातील १२ २१० शाळांचा निकाल हा १०० टक्के जाहीर झाला आहे .

नऊ विभागाचा टक्केवारी निकाल याप्रमाणे
-पुणे विभाग –९६ . ९६ टक्के , नागपुर विभाग –९७ टक्के ,औरंगाबाद विभाग –९६ .३३ टक्के , मुंबई विभाग –९६ . ९४ टक्के ,कोल्हापूर विभाग –९८ . ५० टक्के ,अमरावती विभाग –९६. ८१ टक्के ,नाशिक विभाग — ९५ . ९० टक्के ,लातूर विभाग –९७ .२७ टक्के कोकण विभाग –९९. २७ टक्के .परीक्षेत १०० टक्के गुण मिळविणारे एकूण १२२ विद्यार्थी आहेत.त्यामध्ये सर्वात अधिक मुले ही लातूर विभागात आहेत .त्यांची संख्या ७० इतकी आहे मार्च २०२० च्या तुलनेत यावर्षीच्या निकलची टक्केवारी ही १. ६४ टक्के इतकी जास्त आहेत अशी माहिती त्यांनी सांगितली .

यंदाच्या परीक्षेत राज्यातील १ लाख ६४ हजार ६९८ मुलांना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत .यामध्ये कला,क्रीडा आदि क्षेत्रांचा समावेश आहे .त्याचप्रमाणे १२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलै आणि दहावी ची पुरवणी पोरीक्षा २७ जुलै पासून सुरू होणार आहे असे ते म्हणाले .

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या