22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रदिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट?

दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट?

एकमत ऑनलाईन

नाशिक : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील कोरोना निर्बंध काळजीपूर्वक शिथिल केले आहेत, जीविताचा धोका लक्षात घेऊनच राज्य सरकार पावलं उचलत आहे. अर्थकारण थांबू नये म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यवसाय सुरू करायला परवानगी दिली आहे, असेही नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दरम्यान राज्यात कोरोनाच्या तिस-या लाटेबद्दल त्यांनी महत्त्वाचे विधान केले.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, राज्यात कुठेही कोरोनाच्या तिस-या लाटेची सुरुवात झालेली नाही, मात्र दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येत स्पाईक येण्याची शक्यता असल्याचा टास्क फोर्सचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या राज्यात टेस्टिंग कमी केलेल्या नाहीत. पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरी लाट फ्लॅट झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मुंबईत एकसुध्दा मृत्यू नाही, हा लसीकरणाचा फायदा असल्याचे टोपे यावेळी म्हणाले.

तसेच लहान मुलांना लस देण्याबद्दल बोलताना, डोस उपलब्ध झाले आहेत, लहान मुलांच्या लस घेण्यासाठी इलिजीबल केले असेल, तर आम्ही द्यायला तयार आहोत. लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी द्यावी असी आमची केंद्र सरकारला मागणी असल्याचे टोपे यावेळी म्हणाले.

न्यासा ही ब्लॅक लिस्टेड नाही
आरोग्य विभागाच्या रखडलेल्या परीक्षा रीतसर पद्धतीने होतील, पॅनल ऑफ एजन्सीने सिलेक्शन केलं आहे असे सांगताना न्यासा ही कंपनी ब्लॅक लिस्टेड नाही असे टोपे यांनी स्पष्ट केले. पूर्ण विभागाने दिलेल्या सूचनांचा न्यासा देखील पालन करत आहे. या जागा पारदर्शकपणे आणि गुणवत्तेवर घेतल्या जात असून विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे असे सांगताना विद्यार्थ्यांनी एक परीक्षा द्यायची का वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या याचा चॉईस विद्यार्थ्यांना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या