नागपूर : भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे उदयपूर येथे कन्हैयालाल आणि अमरावतीत उमेश कोल्हेंची हत्या झाली. आता नागपुरातही असाच प्रकार समोर येत आहे.
नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने नागपुरातील एका कुटुंबाला राज्य सोडून पळावे लागले. पोस्टनंतर सतत धमक्या येत असल्याची तक्रारही या कुटुंबाने नंदनवन पोलिसांत दिली आहे.