नागपूर : नविन बाबूरखेडा नागपूर येथील आजीच्या अस्थीविसर्जना करीता आलेले तरुण आंघोळीला गेले असताना वाहून गेल्याची घटना किले-कोलार नांदा कोराडी परिसरात घडली. सायंकाळच्या सुमारास शोध मोहीम सुरू असताना दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले तर एका तरुणाचा शोध एनडीआरएफची तुकडी घेत आहे. मित्राला वाचवताना ही घटना घडल्याचे कळते.
शंतनू उर्फ नयन कैलास येडकर, हर्षित राजू येदवान आणि आकाश राजेंद्र राऊत हे अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी किले कोलार (नांदा कोराडी) येथे आले होते. दुपारी 2 च्या सुमारास अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कोलार नदीच्या पात्रावर शंतनू, हर्षित व आकाश हे तिन्ही मित्र आंघोळीसाठी गेले होते. शंतनू आंघोळीसाठी पाण्यात उतरला असता पाण्याचा अंदाज आला नाही बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी आकाश आणि हर्षितने पाण्यात उडी घेतली. मात्र तिघेही वाहून गेले.
याची माहिती मिळताच एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. एनडीआरएफच्या तुकडीने बराच शोध घेतल्यानंतर आकाश व शंतनूचा मृतदेह आढळून आला, तर हर्षितचा शोध सुरू आहे.
कोरोनावर बैठक; उद्धव ठाकरेंसह 7 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार