22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रसास-यांच्या डोळ्यांदेखत जावयाला ट्रॅक्टरने उडवले

सास-यांच्या डोळ्यांदेखत जावयाला ट्रॅक्टरने उडवले

एकमत ऑनलाईन

जळगाव : जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे शेतात रोटोव्हेटर करत असलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात शेतात काम करणारा शेतमजूर जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी २५ मे रोजी घडली होती.

उपचार सुरू असताना ४ जूनला या शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. बाळू दयाराम देवरे वय ३२ रा. आव्हाणे ता. जळगाव असे मयताचे नाव आहे.

याप्रकरणी रविवारी २६ जूनला ट्रॅक्टर चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तालुका पोलिसात दाखल करण्यात आला आहे. या घटनेवेळी मृत बाळू देवरे यांचेही सासरे आणि मेव्हणे शेतात काम करत होते. त्यांच्या डोळ्यांदेखतच ही दुर्देवी घटना घडली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या