18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeमहाराष्ट्रविरोधकांना जेलमध्ये टाकण्याची परंपरा भाजपचीच - काँग्रेस

विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची परंपरा भाजपचीच – काँग्रेस

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय जनता पक्षाने मागील ८ वर्षांत ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकले आहे. मविआ सरकारमधील दोन मंत्र्यांनाही अशाच पद्धतीने जेलमध्ये पाठवले. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करुन ब्लॅकमेल करण्याचे राजकारणही भाजपानेच केले आहे. विरोधकांना राजकीय वैमनस्यातून जेलमध्ये टाकण्याची परंपरा भाजपाचीच आहे असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

महाविकास आघाडी सरकार आपल्याला जेलमध्ये टाकणार होते या उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा इन्कार करताना अतुल लोंढे म्हणाले की, विरोधकांना राजकीय द्वेषातून जेलमध्ये पाठविण्याचे काम भाजपा सरकारने चालवलेले आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना केवळ एका वरिष्ठ पोलिस अधिका-याच्या पत्राच्या आधारे अटक करुन सव्वा वर्षे जेलमध्ये टाकले. ज्या परमवीरसिंग यांनी ते खोटे पत्र पाठवले त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. कोर्टानेही जामीन देताना जे ताशेरे ओढले आहेत. त्यातून हे एक षडयंत्र होते हे स्पष्ट झाले आहे. कारवाईच्या नावाखाली १०० छापे मारुन देशमुखांच्या कुटुंबियांना नाहक त्रास दिला गेला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही अशाच खोट्या प्रकरणात जेलमध्ये टाकले. माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरही २५ वर्षांचे जुने प्रकरण उकरुन काढून त्यांना जेलमध्ये पाठवले. ही राजकीय दडपशाही भाजपानेच आणल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काही राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग करण्यात आले. नाना पटोले यांचे नाव अजमज खान ठेवून ते अमली पदार्थ्यांचा व्यापार करतात हे दाखवून फोन टॅपिंग केले. याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना ईडी सरकारकडून क्लीट चिट देण्याचा प्रयत्न झाला पण तो कोर्टात टिकू शकला नाही. याप्रकरणातही कोर्टाने फटकारले, हे पाप फडणवीस सरकारचेच आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप करत किरीट सोमय्या यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या.

भावना गवळी वर्षभर गायब झाल्या होत्या आणि सत्ताबदल होताच भावना गवळी थेट पंतप्रधानांना राखी बांधताना दिसल्या. भाजपाने विरोधी पक्षातील नेत्यांवर बेछुट खोटे आरोप करायचे व त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लावून छळ करायचा व त्याच लोकांनी भाजपात प्रवेश केला की नंतर ते गंगेत न्हाऊन पवित्र होतात कसे? काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी जी, राहुल गांधी जी यांनाही चौकशीच्या नावाखाली ईडीच्या कार्यालयात तासनतास बसवून छळ केला तो केवळ राजकीय सुडबुद्धीतूनच. भारतीय जनता पक्षाची ही मोडस ऑपरेंडी आहे. काँग्रेस पक्षाने असे सुडाचे राजकारण केले नाही.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या