22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeमहाराष्ट्र१४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल

१४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल

एकमत ऑनलाईन

मुंबई:राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बिगूल वाजला आहे. संंबंधित ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान, तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीने चितपट केले होते. आता पुन्हा राज्यात कोणाची किती ताकद आहे, हे समजणार आहे.

मदान यांनी सांगितले की, एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-१९ ची परिस्थिती उद्भवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित व नंतर पुर्णपणे रद्द केला होता. यासह डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणा-या व नव्याने स्थापित होणा-या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत आहे. छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जानेवारी २०२१ पर्यंत असणार आहे, त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदानासाठी विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्रा धरण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:
ठाणे- १५८, पालघर- ३, रायगड- ८८, रत्नागिरी- ४७९ , सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६२१, धुळे- २१८, जळगाव- ७८३, नगर- ७६७, नंदुरबार- ८७, पुणे- ७४८ , सोलापूर- ६५८, सातारा- ८७९, सांगली- १५२, कोल्हापूर- ४३३, औरंगाबाद- ६१८, बीड- १२९, नांदेड- १०१५, उस्मानाबाद – ४२८, परभणी- ५६६, जालना- ४७५, लातूर- ४०८, हिंगोली- ४९५, अमरावती- ५५३,अकोला- २२५, यवतमाळ- ९८०, वाशीम- १६३, बुलडाणा- ५२७, नागपूर- १३०, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६२९, भंडारा- १४८, गोंदिया- १८९ आणि गडचिरोली- ३६२.

पवार साहेब महाराष्ट्राची शान : नवनीत राणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या