24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रसाता-यात दोघांना कारने उडविले

साता-यात दोघांना कारने उडविले

एकमत ऑनलाईन

सातारा : सातारा शहरालगत मोळाचा ओढा येथे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांना अनोळखी कारने उडवले. अपघातात तामजाईनगर येथील एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झालेले आहेत. सकाळी ६ वाजता घडलेल्या या अपघातानंतर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.

मोळाचा ओढा येथे झालेल्या या अपघातात अनिल दरेकर (रा. तामजाईनगर, सातारा) हे जागीच ठार झाले. अनिल दरेकर हे शिक्षक होते. तर आणखी एकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, ही घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता घडली. अनिल दरेकर हे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी ते चालत असताना त्यांना अनोळखी वाहनाने उडवले. यावेळी त्यांच्या पुढे असणा-या दशरथ फरांदे (रा. तामजाईनगर) यांनाही धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी माहिती घेऊन तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या