22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रपीएम केअर फंडातून पुण्याला मिळालेले व्हेंटिलेटरही निघाले खराब

पीएम केअर फंडातून पुण्याला मिळालेले व्हेंटिलेटरही निघाले खराब

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा देखील अपुºया पडत असून रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. तर लसीकरण मोहीम देखील अपुºया पुरवठ्यामुळे मंदावली आहे. यावरून राजकारण तापले असून केंद्र सरकारकडून मिळणा-या मदतीसंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यातच पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटरही खराब निघाल्याचे समोर आले आहे.

पीएम केअर फंडातून मिळालेले ५८ व्हेंटिलेटर खराब निघाले आहेत. ससून रुग्णालयाचे डीन डॉ. मुरलीधर तांबे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आढावा बैठकीत या व्हेंटिलेटरविषयी तक्रार केली आहे. आधीच लसीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासोबत दुजाभाव करण्यात येत असल्याचे म्हटले होते. त्यांनी आकडेवारीसह हा दावा केला होता. त्यात आता केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटरच खराब आल्याचे समोर आले आहे.

Section 2 – UK London News PRO

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या