24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रमहिलेने ६ मुलांना विहिरीत फेकले, सगळ्या मुलांचा करुण अंत

महिलेने ६ मुलांना विहिरीत फेकले, सगळ्या मुलांचा करुण अंत

एकमत ऑनलाईन

कौटुंबीक वादातून कृत्य
रायगड : रायगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ढालकाठी बिरवाडी गावातील महिलेने सहा मुलांना विहिरीत फेकून दिले. या घटनेत सहाही मुलांचा करुण अंत झाला आहे. यामध्ये चार मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र महिलेने हे कृत्य का केले, याचा उलगडा लवकर होऊ शकलेला नाही. मात्र, पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

विहिरीत फेकलेल्या सहा मुलांपैकी चार मुली आहेत. तसेच दोन मुले आहेत. सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास महिलेने घराशेजारील विहिरीत या सहा मुलांना फेकले. त्यानंतर तिनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तिला वाचविण्यात यश आले. तथापि, सहा मुलांचा मृत्यू झाला. सहापैकी पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

सायंकाळच्या सुमारास पती- पत्नीचे भांडण झाल्याने महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण महिलेला वाचविण्यात गावक-यांना यश आले. तथापि, विहिरीत फेकून दिलेल्या मुलांना वाचविण्यात यश आले नाही. या दुर्दैवी घटनेत चार मुली आणि दोन मुलांचा करुण अंत झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या