पैठण : पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच दिवशी पत्नीच्या वाट्याला छळ आल्याची घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे घडली आहे. तेराव्याच्या विधीचा कार्यक्रम आवरल्यानंतर ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावरवाडी येथील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम आवरला होता. त्यानंतर आरामासाठी मृत व्यक्तीची पत्नी आपल्या चुलत सासूच्या घरी आरामासाठी थांबली होती. त्यावेळी महिलेच्या चुलत दीराने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, महिलेने नकार देऊनही बळजबरीने चुलत दीराने बलात्कार केल्याने सदर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.