19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रजागर मुंबईचा यात्रेचा रविवारी मातोश्रीच्या दारातून शुभारंभ

जागर मुंबईचा यात्रेचा रविवारी मातोश्रीच्या दारातून शुभारंभ

एकमत ऑनलाईन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडणार नारळ
मुंबई : कुठल्याही क्षणी मुंबई महापालिका निवडणुका घोषित होतील, त्याआधी मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच भाग असलेल्या जागर मुंबईचा यात्रेला उद्या सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे मातोश्रीच्या दारातून ही यात्रा सुरू होईल.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला थेट आव्हान देण्यासाठी भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जागर मुंबईचा यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेची सुरुवात उद्या वांद्रे पूर्व येथील गव्हर्मेंट कॉलनीमधून होईल. पहिल्या दिवशी आशिष शेलार आणि पुनम महाजन यांच्या सभेने या अभियानाची सुरुवात होणार आहे.

मुंबईची शांतता धोक्यात आणून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. एका विशिष्ट वर्गाचे तुष्टीकरण केले जात आहे, असा आरोप करत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जागर मुंबईचा हे अभियान घोषित केले आहे. मुंबई महापालिकेत विधानसभेचे ३६ मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघांवर डोळा ठेवून भाजपने यात्रेचे आयोजन केले आहे.

सर्वच्या सर्व वॉर्डमध्ये सभा घेण्याचे भाजपचे नियोजन आहे. शिवसेनेने मात्र या यात्रेवर टीकास्त्र सोडले. मुंबई महापालिका निवडणूक कुठल्याही क्षणी घोषित होईल. गेल्यावेळी ८२ जागा जिंकत भाजपने मुसंडी मारली होती. यंदा महापालिकेवर झेंडा फडकवायचा, असा भाजपचा इरादा आहे. पण शिवसेनेसाठी ही नेटाची लढाई असेल. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रंगत आली आहे. आता मुंबईकर नेमकी कोणाला साथ देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या