30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात पुरेशा कोरोना चाचण्या होत नाहीत

महाराष्ट्रात पुरेशा कोरोना चाचण्या होत नाहीत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण ठेवण्यास राज्य सरकार कमी पडले. तसेच प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत राजेश भूषण यांनी महाराष्ट्रात कोरोना चाचण्या पुरेशा प्रमाणात होत नाहीत, असे सांगत पुन्हा एकदा ठपका ठेवला आहे.

महाराष्ट्रात आरटी-पीसीआर चाचण्यांमध्येही कमतरता असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा ५७ हजारांवर पोहोचला असून, ही रुग्णसंख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या हळूहळू वाढत असली, तरी पुरेशी नाही, असेही भूषण यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात ५७ टक्के आरटी-पीसीआर टेस्ट
महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात ५७ टक्के आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. फेब्रुवारी महिन्यात हाच आकडा ७०.३ टक्क्यांवर होता, असे सांगितले जात आहे. आरटी-पीसीआर आणि कोरोना चाचण्या या दोन्ही महत्त्वाच्या आहेत, असे भूषण यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नमुना चाचणी, रुग्णांची शोधमोहीम आणि प्रतिबंधात्मक विभागांमधील व्यवस्था, कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन व त्यांची अंमलबजावणीची स्थिती, रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा, ऑक्सिजन सुविधा- वैद्यकीय सुविधा-अतिदक्षता विभाग तसेच अन्य विभागातील खाटांची उपलब्धता आणि लसीकरणाचा वेग अशा प्रमुख पाच बाबींचा आढावा घेण्याची सूचना केंद्रीय पथकांना करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांत केंद्राचे पाहणीपथक
राज्यातील ३० जिल्ह्यांतील परिस्थितीची पाहणी ही पथके करत असून त्यांच्याकडून दररोज केंद्र व राज्य सरकारांना अहवाल दिला जात आहे. तसेच या पथकाकडून गरजेनुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेला सूचना आणि सल्ला दिला जात आहे. केंद्रीय पथकाने भेट दिलेल्या एकाही जिल्ह्यामध्ये कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळले.

गंगा मातेच्या कृपेने कोरोना होणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या