22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रम्युकरमायकोसिसच्या औषधांचाही तुटवडा

म्युकरमायकोसिसच्या औषधांचाही तुटवडा

एकमत ऑनलाईन

नागपूर : कोविड महामारीच्या दुस-या लाटेतून नागपूरकर सावरत नाहीत, तोच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा विळखा शहराला पडला आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये या आजाराचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यामुळे एक नवे संकट उभे राहिले असताना आता या आजारावरील औषधांचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

कोविडवर मात केलेल्या सरासरी १० टक्के रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची गंभीर लक्षणे दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे साहजिकच या बुरशीजन्य आजाराची दाहकता कमी करण्यासाठी एम्पोटेरिसीन बी, फोटॉन, लिपो सोमॉल यांसारख्या अँटिफंगस औषधांची मागणी पूर्वीच्या तुलनेत २०० पटींनी वाढली आहे. म्यूकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या आणि उपचार सुरू असलेल्या रुग्णांना अन्य काही औषधांबरोबरच शरीराच्या अवयवांवरील बुरशीचा संसर्ग थांबविण्यासाठी इम्युनोसिन अल्फा, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवून प्राणवायूची पातळी वाढण्यासाठी दिले जाणारे अ‍ॅक्टेम्रा या औषधांचीही मागणी वाढली आहे.

कोविडचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ््या होत आहेत. त्यामुळे रक्त पातळ करणा-या लो मॉलिक्युलर हिटरीन या औषधाचाही बाजारात तुटवडा भासत आहे. मागणीच्या तुलनेत ही औषध उपलब्ध होत नसल्याने आता रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे. नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सचिव हेतल ठक्कर यांनी या संदर्भातील वस्तुस्थितीची माहिती दिली.

रुग्णांना द्यावे लागतात अनेक डोस
गेल्या काही दिवसांपासून म्यूकरमायकोसिस संदर्भात डॉक्टरांकडून सुचविलेल्या औषधांची मागणी आमच्याकडे वाढली आहे. यात प्रामुख्याने एम्पोटेरिसीन बी, फोटॉनसारख्या अँटिफंगस औषधांचा समावेश आहे. भारत सिरम, मायलान सारख्या ८ ते १० औषध कंपन्या ही औषधे बनवतात. रुग्णाच्या वजनानुसार या औषधांचा डोस दिला जातो. साधारणपणे एका दिवसाला ६ डोस पासून ते रुग्णाला १६० पर्यंतही डोस द्यावे लागत आहेत. त्यामुळे मागणी वाढली आहे, असे ठक्कर यांनी सांगितले.

सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांना कमी ऑक्सिजन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या