27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रसमझने वालो को इशारा काफी है : चंद्रकांत पाटील

समझने वालो को इशारा काफी है : चंद्रकांत पाटील

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधान परिषदेच्या मोठ्या विजयानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विजयासाठी मविआतील अस्वस्थ आमदारांची मदत झाल्याचे विधान करत मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी राज्यसबेसाठी २ जागा लढवा असा प्रस्तावही मविआकडून आला होता असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

पक्षातील मानहानीला कंटाळून आमदारांचे भाजपला मतदान केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मविआतील नेत्यांना आपल्याच पक्षातील आमदारांवर विश्वास नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. परिषदेत मागात घेतो असे सांगूनही माघार घेतली नाही असे सांगत मविआतील आमदारांना सरकारबद्दल विश्वास नसल्याचे उघड या घटनेनंतर उघड झाले आहे. दरम्यान, शिंदे नॉट रिचेबल झाल्यापासून कुणाच्याही संपर्कात नव्हेत मात्र, काही वेळापूर्वी शिंदे यांनी एक ट्वीट केले. त्यावर पाटील यांना विचारले असता चंद्रकांत पाटी यांनी समझने वालो को इशारा काफी है! असे सूचक विधान केले आहे.

शिंदेंचं ट्वीट काय
काही वेळापूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले होते. यामध्ये त्यांनी आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असे म्हटले होते. त्यांच्या या ट्वीट नंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून, राज्यात सत्ता बदल होऊन मोठा भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या