27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या अपमानाचा विषयच नाही

अजित पवारांच्या अपमानाचा विषयच नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नसल्याने सत्ताधारी नेत्यांनी भाजपाला धारेवर धरलं आहे. या पार्श्वभूमीवर वादाला तोंड फुटले असून यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाटील म्हणाले, राज्यातील सत्ताधा-यांनी प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये. देहूतील कार्यक्रमांमधून वाद निर्माण करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं होतं, मात्र मी बोलणार नाही असे अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अजित पवार यांच्या अपमानाचा विषय नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

या वादावरून खासदार सुप्रिया सुळे यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावे अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. पण पीएमओने त्याला काही उत्तर दिले नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या