22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रकारागृहात आढळले २२ कैदी पॉझिटिव्ह

कारागृहात आढळले २२ कैदी पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कारागृहातील २२ कैदी कोरोना बाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अँटीजेन चाचणीत केलेल्या तपासणीमध्ये हे २२ कैदी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. संगमनेर पोलिस ठाण्याजवळ संगमनेर कारागृह आहे येथील हे सगळे कैदी आहेत.

या कारागृहामध्ये संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव व आश्वि पोलीस ठाण्यातील तब्बल ४६ कैदी जेरबंद होते. कारागृहात बंद असलेल्या कैद्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून या चाचणीमध्ये ४६ पैकी तब्बल २२ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती संगमनेर तहसीलदार निकम यांनी दिली आहे. त्यामुळे कैद्यांना घेऊन न्यायालयात हजर करायचे की नाही?, की त्यांना पोलीस कोठडी किंवा न्यायलयीन कोठडी द्यावी की नाही असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर या आरोपींच्या जीवितास काही झाले तर याला जबाबदार कोण? असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे. दरम्यान, या पॉझिटिव्ह कैद्याच्या संपर्कात नेमके किती पोलीस कर्मचारी संपर्कात आले होते. याचा देखील आता तपास घेतला जात आहे.

दरम्यान, कारागृहात कोरोनाबाधित आढळून आलेल्या या २२ कैद्यासाठी जेल कम कोविड केअर सेंटरची उभारणी देखील करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार निकम यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात सद्य परिस्थितीत कोरोना बाधितांची एकूण संख्या ही ४१८५ वर पोहचली असून कोरोनामुळे आत्तापर्यंत तब्बल ६० लोकांचा जीव गेला आहे.

Read More  फेवीपिरावीर बाजारात लॉन्च : किंमत प्रति गोळी 59 रुपये

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या