22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढं ढकलण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परंतु राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी च्या परीक्षा होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आली आहे.

सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे महाराष्ट्र शिक्षण मंडळाची दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील रद्द होणार की काय? अशा शंका लागलीच विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित होऊ लागल्या आहेत. त्यावर खुलासा करताना राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही. सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या, तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य शिक्षण मंडळाचा विचार नाही, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

 

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या