23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्र‘आरे’तच कारशेड होणार; शिंदे-फडणवीस सरकारने बंदी उठवली

‘आरे’तच कारशेड होणार; शिंदे-फडणवीस सरकारने बंदी उठवली

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेडवर घातलेली बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे त्यामुळे कारशेड आरे येथे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना कारशेडच्या या प्रकल्पावर स्थगिती आणली होती. त्यामुळे मागच्या अडीच वर्षांपासून कारशेडचे काम बंद होते. आता ही बंदी उठवल्याने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर हा प्रकल्प सुरू होणार अशा चर्चा चालू होत्या.

दरम्यान, महाविकास आघाडीने मेट्रोच्या कार्यकारी संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांची बदली केली होती पण शिंदे सरकारने सत्तेत आल्यावर मुंबई मेट्रोचा कारभार पुन्हा अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवला होता. त्यामुळे कारशेडचे काम पुन्हा सुरू होणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आता सरकारने कारशेडवरील बंदी उठवल्यामुळे मार्ग मोकळा झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या