22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रस्मार्ट हेल्मेटने मिनिटात २०० जणांचे थर्मल स्क्रिनिंग!

स्मार्ट हेल्मेटने मिनिटात २०० जणांचे थर्मल स्क्रिनिंग!

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी व्यक्तिगत थर्मल स्क्रिनिंग न करता स्मार्ट हेल्मेटच्या माध्यमातून एका मिनिटांत २०० जणांचे थर्मल स्क्रिनिंग केली जात आहे. दहिसरमध्ये हा उपक्रम सुरु झाला असून आतापर्यंत ६ हजार ५०० जणांची तपासणी करण्यात आली.

तपासणी, चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी पालिका आता स्मार्ट हेल्मेटच्या माध्यमातून थर्मल स्क्रिनिंग करीत आहेत. कोरोनाच्या लक्षणांमध्ये ताप येणे हे महत्त्वाचे लक्षण आहे. त्यामुळे ताप ओळखण्यासाठी स्क्रिनिंग मशीनचा वापर करण्यात येत आहे. मात्र या मशिनने एका वेळी फक्त एकाचीच तपासणी करण्यात येते. ही संख्या वाढवण्यासाठी आता थर्मल स्क्रिनिंगसाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर केला जात आहे. यामध्ये एका वेळी दोन रांगांमध्ये दोनशे लोक उभे केले तरी स्मार्ट हेल्मेट घातलेल्या आरोग्य कर्मचार्‍याच्या माध्यमातून एका मिनिटात २०० जणांचे तापमान तपासता येते.

हेल्मेटला उजव्या आणि डाव्या बाजूला थर्मल स्क्रिनिंग मशीन असते. त्यामुळे ताप असलेली व्यक्ती समजली जात असल्याने सदर व्यक्तीला तातडीने बाजूला काढता येते, अशी माहिती उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली. यावेळी विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, ‘आर उत्तर’च्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यादेखील उपस्थित होत्या. भारतीय जैन संघटनेकडून उपलब्ध करून दिलेल्या या हेल्मेटच्या माध्यमातून पालिका ही तपासणी करीत आहे. सध्या विभागात घरोघरी जाऊन या स्मार्ट हॅल्मेटच्या माध्यमातून फळविक्रेते, दुकानदार आदींची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात येत आहे.

या तपासणीत सोशल डिस्टनसिंग पाळले जाते. स्मार्ट हेल्मेट स्क्रिनिंगमुळे तपासणी करणारा आरोग्य कर्मचारी आणि तपासणी करण्यात येणारी व्यक्ती यांच्यात सुमारे चार ते पाच फुटांचे अंतर असते. स्क्रिनिंगसाठी ही सुरक्षित पध्दत असून त्यामुळे वेगाने तपासण्या होत आहेत.

Read More  श्रीराममंदीर भूमिपूजन : राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना तंबी !

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या