मुंबई : स्वरा भास्करसोबतच फरहान अख्तर, कंगना राणावत, नसिरूद्दीन शाह यांनी नुपूर शर्मा यांच्या या वक्तव्याबाबतचे त्यांचे मत व्यक्त केले होते. बिनधास्तपणे आपली मते मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते.
यावेळी ती पुन्हा चर्चेत आली आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली होती. आता स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे. गौतम गंभीर यांनी ट्विट करत लिहिले आहे की, माफी मागितली असतानाही एका महिलेला देशात जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. यावर कथित सेक्युलरवादी शांत बसले आहेत. या ट्विटवर रिप्लाय देत इन्स्टाग्रामवर स्वराने एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये स्वराने लिहिलं, पण त्यांना बुलडोझरचा आवाज ऐकू आला नाही. स्वराच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर भारतात निदर्शने झाली. एवढंच नाही तर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. काही आखाती राष्ट्रांनी या वादग्रस्त वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. नुपूर यांना पाठिंबा देत नुकतंच गौतम गंभीरने हे ट्विट केलं. स्वरा भास्करसोबतच फरहान अख्तर, कंगना राणावत, नसिरूद्दीन शाह यांनी नुपूर शर्मा यांच्या या वक्तव्याबाबतचे त्यांचे मत व्यक्त केले होते.