26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंच्या सुरक्षेचे तीनतेरा

आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेचे तीनतेरा

एकमत ऑनलाईन

रत्नागिरी : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात राज्यातील सत्तांतरामुळे होत असलेली पडझड रोखण्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. दरम्यान, दौ-यादरम्यान, सुरक्षा रक्षकांच्या गाड्या खासगी दिसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिक पुरेसे असल्याचे म्हटले आहे.

आदित्य ठाकरे हे दुपारी १२.४० च्या दरम्यान रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. झेड सुरक्षा असताना खासगी गाड्या सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या. सुरक्षा रक्षक खासगी गाड्यातून आले असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात राज्य सरकारने आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत तडजोड केली असल्याची चर्चा रंगली आहे.

आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेल्या पोलिस तसेच सुरक्षारक्षकांना पोलिसांची गाडी असणे अपेक्षित असताना त्यांना खासगी गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या यापूर्वीच्या दौ-यात पोलिसांचा फौजफाटा होता, परंतु रत्नागिरी दौ-यात सुरक्षारक्षकांना खासगी गाड्या देऊन त्यावर पोलिस असे लेबल लावण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठांनी गाड्या मुंबईतच रोखल्या असल्याचे समोर आले. परवानगी मागितली होती. पण सुरक्षा रक्षकांच्या ज्या गाड्या असतात त्या नेण्यास परवानगी देण्यात आली नसल्याने. आदित्या ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक खासगी गाड्यातून आले.

या चर्चेनंतर आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य केले. माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिक पुरेसे, सुरक्षेपेक्षा फॉक्सॉन प्रकल्प महत्त्वाचा, रिफायनरी बाबत दोन्ही बाजू ऐकून घेणार असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या