मुंबई : कंगनाच्या विधानांवरून चर्चा सुरू असतानाच हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल भूमिका मांडली आहे. मात्र, अनुरागच्या भूमिकेचा संदर्भ देत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर या वादात अनुराग कश्यपने उडी घेत आपल्याला महाराष्ट्रात सुरक्षित वाटते. उद्धव ठाकरे यांच्यामुळे माझी शिवसेनेबद्दलची मतंही बदलली, असे मत व्यक्त केले.अनुरागने मांडलेल्या भूमिकेचा हवाला देत नितेश राणे यांनी टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली? म्हणजे बाळासाहेबाच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे. हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमुटपणे ऐकून घ्यायचं.,’ असे निलेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली? म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे.
हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमुटपणे ऐकून घ्यायचं…. pic.twitter.com/as6mWsRcSK
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 19, 2020
निराधार पेन्शनधारकांवर महाविकास आघाडी सरकारने आनली उपासमारीची वेळ