नागपूर : शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या ‘अजान’ स्पर्धेसंदर्भात दिलेल्या सल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून मंगळवारी भाजप नेते तथा राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा नाकारल्याचा आरोप केला. एवढेच नाही, तर शिवसेना आता ‘वोट बँकेचे राजकारण’ करत आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस नागपूर येथे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलायला हवे. पांडुरंग सकपाळ यांनी नुकतेच उर्दू न्यूज पोर्टल बसीरत आॅनलाईनशी बोलताना अजान स्पर्धेसंदर्भात भाष्य केले होते. फडणवीस म्हणाले, ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही. या मुद्द्यावर ते नेहमी लढत राहिले आणि शिवेसना, बाळासाहेबांनी ‘सामना’त लिहिलेल्या त्यांच्या लेखांच्या आणि वक्तव्यांच्या बरोबर उलटे कार्य करत आहे.
एका प्रश्नावर फडणवीस म्हणाले, आम्ही मुस्लीम समाजाकडे कधीही व्होट बँक म्हणून पाहिले नाही. तसेच आम्हाला तुष्टीकरणाचे राजकारण नको आहे़ मुस्लीम समाजही ‘सबका साथ, सबका विकास’चा भाग आहे.
केंद्र सरकार आणि शेतक-यांमधील बैठक निष्फळ