कोल्हापूर : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत अनेक लोकप्रिय घोषणा केल्याने हा चुनावी जुमला असल्याची प्रतिक्रिया विरोधकांकडून होत आहे. विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनीही जनमत विरोधात असल्याने भुलवण्यासाठी पोकळ घोषणांचा संकल्प केल्याची टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित ठाकरे, उद्धव ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही बजेटवरून टीकास्त्र सोडले आहे. सतेज पाटील यांनी बजेटवरून प्रतिक्रिया देताना सांगितले की, जनमत आपल्या विरुद्ध असल्याची जाणीव झाल्याने लोकांना भुलवण्यासाठी केलेल्या पोकळ घोषणांचा हा संकल्प आहे. शेती, रोजगार अशा मूलभूत प्रश्नांच्या बाबतीत जनतेच्या तोंडी पाने पुसलेली आहेत!