नागपूर : छत्रपतींच्या गनिमी काव्याने हे नव सरकार आले आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज उपमुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच ते नागपूरमध्ये आले आहेत. यावेळी फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाकडून त्यांची विजयी फेरी काढण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
महाराष्ट्रात राज्य कोण चालवत होते हे कळत नव्हते. सर्वोत्तम राज्य बनवण्याचे काम करणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिला. जनतेच्या पाठिंब्यासाठी नेहमी ऋणात राहीन. पुढील अडीच वर्ष हे प्रगतीचे असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी जयहिंद, जय भारत अशा घोषणा फडणवीस यांनी दिल्या.