सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे सत्ताबदलाचे वारे वाहू लागले असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये असं घडलं नसतं, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून ३५ पेक्षा जास्त शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.
पण जर मला उमेदवारी शिवसेनेने दिली असती तर आज शिवसेनेची अशी अवस्था झाली नसती, असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आज विश्रांतवाडीमध्ये पालखी सोहळ्यातील वारक-यांचे स्वागत केले.