26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रयंदा हिवाळी अधिवेशनात लसीचे २ डोस अनिवार्य

यंदा हिवाळी अधिवेशनात लसीचे २ डोस अनिवार्य

एकमत ऑनलाईन

नागपूर : यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणा-या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचारी अशा सर्वांना लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येकाला ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करणे अनिवार्य असेल, असे निर्देश विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र विधीमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. याबाबतच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक भागवत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात झाली. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे. या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांसह विविध संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

स्वीय सहाय्यकांना प्रवेश दिला जाणार नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित प्रवेश राहील. त्यामुळे विधिमंडळ सभागृह परिसरात सदस्यांच्या स्वीय सहाय्यकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठीची व्यवस्था प्रवेशद्वाराच्या बाहेर करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सभागृहामध्ये ‘सोशल डिस्टंन्सिंग राखायचे असल्यामुळे सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था करण्यात येईल. अभ्यागतांना कामकाज बघण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या