23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रव्हीडीओ कॉल करून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी

व्हीडीओ कॉल करून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईला बॉम्बने उडवण्याची निनावी धमकी दिली आहे. सांताक्रूझ येथील एका रहिवाशाला व्हीडीओ कॉल करून एका अज्ञाताने मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली असून याप्रकरणी सांताक्रूझ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांताक्रूझ येथील एका रहिवाशाला एका व्यक्तीकडून व्हीडीओ कॉल आला आणि मुंबईला बॉम्बने उडविणार असल्याची धमकी दिली आहे. त्यानंतर या नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान याअगोदर अनेकवेळा कॉल करून मुंबई उडवण्याच्या धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तर सामान्य व्यक्तीला व्हीडीओ कॉल करून धमकी दिल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या