28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रसांगलीतील तीन शेतमजुरांचा विषारी द्रव पिल्याने मृत्यू

सांगलीतील तीन शेतमजुरांचा विषारी द्रव पिल्याने मृत्यू

एकमत ऑनलाईन

सांगली : सांगली जिल्ह्यातील तीन शेतमजुरांचा आंध्र प्रदेशमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान नशेसाठी म्हणून अल्कोहलमिश्रित विषारी द्रव पिल्याने तीन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे घडली.

हे तिघे तासगाव तालुक्यातील सावळज व सिद्धेवाडी येथील आहेत. सदाशिव सदाकळे (वय ४३), दीपक जयसिंग शिरतोडे (वय ४४, दोघे रा. सावळज) व भरत नामदेव चव्हाण (वय ४२, रा. सिद्धेवाडी) अशी तिघांची नावे आहेत.

सांगलीचे तीन शेतमजूर आंध्र प्रदेशमधील एका द्राक्ष व्यापा-याकडे कामासाठी होते. सदाशिव, दीपक व भरत हे तिघे शेतमजूर म्हणून काम करतात. अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे एका द्राक्ष व्यापा-याकडे त्यांच्या शेतात ब-याच दिवसांपासून काम करतात. दरम्यान द्राक्ष व्यापा-याने त्यांना त्यांच्यासाठी निवाराही दिला होता. मागच्या दोन दिवसांपूर्वी तिघांनी अल्कोहलमिश्रित विषारी द्रव पिले असल्याचे समजते. हे द्रव पिल्यानंतर काही तासांत त्या तिघांची प्रकृती बिघडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या