30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रतीन महिन्यांचा पगार शहीदच्या कुटुंबाला; नवनीत राणांची घोषणा

तीन महिन्यांचा पगार शहीदच्या कुटुंबाला; नवनीत राणांची घोषणा

एकमत ऑनलाईन

अमरावती : कोरोनाच्या या भीषण काळात सर्वच स्तरांतून नागरिकांना मोठा धक्का बसला. अशात आता त्यांच्या मदतीला राजकीय नेते धावून येत असल्याचे दिसत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांतून नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी असाच एक मोलाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला आणि त्यानंतरचा पगार शेतक-यांना देणार असल्याची घोषणा नवनीत राणा यांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील पिंगळखुटा इथल्या जवान कैलास दहीकर यांचा कर्तव्यावर असताना

कुल्लू-मनालीत मृत्यू झाला होता. त्याच्या अकाली जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपला खासदारकीचा पगार शहीद कैलास दहीकर यांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल २ लाख ५१ हजार रुपयांचा पगार हा नवनीत राणा यांनी शहीद जवानाच्या कुटुंबाला दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सैनिक कैलास यांच्या आई-वडील आणि पत्नीला हा धनादेश सुपुर्द करण्यात आला. अमरावतीत एका कार्यक्रमात हा धनादेश देण्यात आला.

खरंतर, नवनीत राणा या नेहमीच त्यांच्या खास उपक्रमांमुळे चर्चेत असतात. कधी त्या शेतात जाऊन शेतक-यांसोबत काम करतात तर कधी शेतक-यांसाठी उपोषणाला बसणे असो. त्यामुळे आताही खासदार राणा यांच्या या निर्णयामुळे सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, यानंतरचा पुढचा पगार हा शेतक-यांना देण्यात येणार असल्याची घोषणा नवनीत राणा यांनी केली आहे.

रतनचंद शहा सहकारी बँक टेंभुर्णी शाखेमध्ये ५ कोटी ५७ लाख रुपयांचा अपहार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या