24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रआणखी तीन स्टार किड्स रडारवर?

आणखी तीन स्टार किड्स रडारवर?

एकमत ऑनलाईन

मुंबई : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अद्यापही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून समोर आलेल्या माहितीच्या आधारावर न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्याच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आलीय. आर्यन खानच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव समोर आल्याने एनसीबीतर्फे तिची देखील चौकशी करण्यात आली होती.

अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात अमली पदार्थांच्या खरेदीवरून चॅट झाल्याचे समोर आले आहे. एका वृत्तानुसार आर्यन आणि अनन्यामध्ये ड्रग्जसंबंधी चॅट झाले होते. यातच आता आर्यनचे काही इतर चॅटही समोर आले आहेत. ज्यात आर्यनने त्याच्या मित्रांना मस्करी करत एनसीबी त्यांची चौकशी करणार असल्याचे म्हणत त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केलाय.

व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये आर्यन खान अचित कुमारशी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज खरेदी करण्यासाठी बोलत आहे. आर्यनने अचित कुमारकडून ८० हजार रुपयांचे ड्रग्ज मागवले होते. एवढंच नव्हे तर आर्यन खानच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या चौकशीत मिळालेल्या डेटामधून त्याने इतर दोन जणांशी ड्रग्जसंबधी केलेलं ग्रुप चॅट समोर आलेय. अनन्या पांडे व्यतिरिक्त आर्यन खानने आणखी तीन सेलिब्रिटी किड्ससोबत चॅट केल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. काही ड्रग पेडलर आणि सप्लायर बॉलिवूडमध्ये त्यांचा जम बसवण्यासाठी आणि ड्रग्ज विक्रीसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे.

उत्पन्नाच्या स्रोताची तपासणी
तपास पथकाने यापूर्वीच काही आरोपींच्या व्यवहाराच्या नोंदी गोळा केल्या आहेत ज्यांच्याकडून ‘व्यावसायिक’ किंवा मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, असे अधिका-याने सांगितले. एनसीबी आरोपींच्या उत्पन्नाचे स्रोत देखील तपासत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स शोधणार
तपास पथक आरोपींच्या मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटमधून डिलीट करण्यात आलेले मेसेज आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स शोधून काढत आहे आणि त्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे का ते तपासत आहे.

‘इंडस्ट्रीमधील प्रत्येकाची मुले एकदा तरी तुरुंगात जातील..’ : मिका सिंग
अभिनेत्री रविना टंडन, अभिनेता हृतिक रोशन पाठोपाठ आता मिका सिंगने आर्यन आणि शाहरूखला पाठिंबा देत ट्वीट केले आहे. मिकाने संजय गुप्ता यांचे ट्वीट रीट्वीट केले आहे. ‘तुमचे अगदी बरोबर आहे. सर्वजण काय सुरू आहे हे फक्त पाहात आहेत, पण एकही शब्द बोलत नाहीत. माझा शाहरूख खानला पाठिंबा आहे. आर्यन खानला जामीन मिळायला हवा. मला असे वाटते इंडस्ट्रीमधील प्रत्येकाची मुले एकदा तरी तुरुंगात जातील, तेव्हाच सर्वजण एकत्र येतील’ या आशयाचे ट्वीट मिका सिंगने केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या