24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रनाशकात दोन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

नाशकात दोन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात आणि नायगाव रोडवर मापरवाडी येथे मंगळवारी सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण ठार झाले आहेत. महोदरी घाटातील अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत नाशिक शहरासह जिल्ह्यात अपघाताच्या घटनांचे प्रमाण वाढत असून सध्या पावसाचे दिवस असल्याने अपघात अधिकाधिक होत आहेत.

नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या मोहदरी घाटात पुन्हा एकदा अपघातांची मालिका सुरू झाली आहे. एकाच दिवशी दोन अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा मोहदरी घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सकाळी सव्वा आठ वाजता नाशिकहून सिन्नरकडे येताना मोहदरी घाटात खाजगी जीप वळणावर पुढील वाहनावर धडकली.

या अपघातात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे तर दुस-या एका अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात विना नंबर प्लेट असलेली मॅक्स सवारी हे खाजगी प्रवासी वाहन नाशिकहून सिन्नरकडे येत होते. मोहदरी घाट चढताना सुरुवातीच्याच वळणावर ओव्हरटेक करताना अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली.

यामुळे अपघातात शारदा मोरे या महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात संतोष गडाख, मनीषा मुकेश सावंत, ललिता प्रभाकर जाधव, पुष्पा प्रदीप खंडारे, शोभा कैलास शिंदे या पाच जणांना गंभीर दुखापत झाली आहे.

तर दुस-या घटनेत सकाळच्या सुमारास पल्सर दुचाकीने दोन तरुण माळेगाव एमआयडीसीतून नायगाव रोडने सिन्नरकडे येत होते. मापारवाडी शिवारात ते आले असता समोरून येणा-या मातोश्री इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या