25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रअमरावती कारागृहातून तीन कैदी पळाले

अमरावती कारागृहातून तीन कैदी पळाले

एकमत ऑनलाईन

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षाव्यवस्था भेदून तीन कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

साहिल अजमत कळसेकर (३३ रा. रत्नागिरी), सुमीत शिवराम धुर्वे (२२), रोशन गंगाराम उइके (२३), दोघेही रा. शेंदूरजनाघाट, अशी फरार झालेल्या कैद्यांची नावे आहेत. या तिन्ही कैद्यांना मध्यवर्ती कारागृहातील बरॅक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात आले होते.
सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देऊन हे कैदी बरॅक आणि तुरुंगाची भिंत ओलांडण्यात यशस्वी ठरले.

साहिल कळसेकर हा हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत होता, तर सुमीत धुर्वे आणि रोशन उईके हे बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरलेले कैदी आहेत. या कैद्यांनी तुरुंगाची भिंत कशी ओलांडली, याबाबत तुरुंग प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसांनी फरार झालेल्या कैद्यांचा शोध सुरू केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या