24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रपोहायला गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

पोहायला गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

एकमत ऑनलाईन

बीड : बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये पोहायला गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीडच्या पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्याच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दुसरीकडे गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील गोदावरी नदीमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

ओंकार लक्ष्मण काळे (वय १६), शिव संतोष पिंगळे (वय १६, दोघेही रा. बीड) व तानाजी लिंबाजी आरबड (वय १७, रा. सुरळेगाव, ता. गेवराई) अशी मृत्यू पावलेल्या तिघांची नावे आहेत. यातील ओंकार काळे आणि शिव पिंगळे हे दोघेही, पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. तर, गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे सकाळी ८ च्या दरम्यान पोहण्यासाठी गेलेला तानाजी आरबड या तरुणाचा देखील गोदावरी नदीच्या डोहामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. ३ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या