31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeक्राइमउपासमारीची वेळ : सलून व्यावसायिकाचा अखेर मृत्यू, 4 वर्षाच्या मुलासोबत घेतलं होतं...

उपासमारीची वेळ : सलून व्यावसायिकाचा अखेर मृत्यू, 4 वर्षाच्या मुलासोबत घेतलं होतं विष

एकमत ऑनलाईन

सांगली :  कोरोनामुळे राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे. या उपासमारीने सांगली जिल्ह्यात एका सलून व्यावसायिकाचा बळी घेतला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावामधील विष प्राशन केलेल्या नवनाथ साळुंखे या सलून व्यावसायिकाचा अखेर गुरुवारी मृत्यू झाला. नवनाथ याने आर्थिक लॉकडाऊनला कंटाळून त्याचा 4 वर्षांच्या मुलाला विषारी द्रव्य पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नवनाथसह त्याच्या मुलावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान नवनाथचा मृत्यू झाला. नवनाथच्या मुलाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सलून दुकाने बंद असल्याने उपासमारीला कंटाळून 10 जून रोजी नवनाथ याने आपल्या मुलासह विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

इरळी येथील रहिवासी नवनाथ साळुंखे यांचा सलूनचा व्यवसाय होता. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असलेने नवनाथ आर्थिक अडचणीत सापडला होता. जगावं तरी कसं? कुटुंबाचं पोट भरावं कसं असा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला होता. याच नैराश्यातून नवनाथ यानं पोटच्या 4 वर्षाच्या मुलाला विषारी द्रव्य पाजून स्वत:ही आत्महातेचा प्रयत्न केला होता. ही बाब इतरांच्या लक्षात आल्यानं बापलेकाला तातडीनं सांगली सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोघांची प्रकृती चिंताजनक होती. मुलाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. मात्र, नवनाथ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.राज्यात लॉकडाऊन 4 नंतर सलून दुकाने सोडून सर्व व्यावसायिकांना व्यवसायाची परवानगी देण्यात आली. सलून दुकाने बंद असलेने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सलून दुकानदारानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शासनाने सलून व्यवसायिकांना आर्थिक मदत देऊन दुकाने चालू करणेची परवानगी दयावी, अशी मागणी केली जात आहे.

Read More  सासू आणि पत्नीच्या गर्भातील अर्भकाचा खून केल्याप्रकरणी पतीला फाशीची शिक्षा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या