22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रऑक्सिजन निर्मितीसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन देणार-राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

ऑक्सिजन निर्मितीसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन देणार-राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१२(प्रतिनिधी) पुढील काही दिवसात राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून ‘महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजनेंतर्गत उद्योगांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे.त्यातच आगामी चार-पाच महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात सध्या मोठया प्रमाणात प्राणवायूचा तुटवडा जाणवतो आहे. सध्या राज्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता प्रतिदिन १३०० मे.टन असून,मागणी मात्र १८०० मे.टनावर गेली आहे. तिसऱ्या लाटेत ही प्रति दिन २३०० मे.टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने ऑक्सीजन निर्मिती व साठा वाढविणे, क्रिटीकल गॅप शोधून कार्यवाही करणे, लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट वर उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्य ऑक्सीजन निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी व आवश्यक ऑक्सीजन निर्मितीचे उदिष्ट साध्य करण्याकरीता, राज्यामध्ये “मिशन ऑक्सीजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहने मंजुर करण्याचा व याअनुषंगाने इतर उपाययोजना राज्यामध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पातील अडथळा दूर
पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी दिलेल्या बालेवाडी येथील जागा देताना शासनाने घातलेल्या अटी शिथील करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा मेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी सहभागाने “संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरीत करा” या तत्वावर विकसीत करण्यात येत आहे. निविदेतील अटी/शर्तीनुसार सदर जमीन सवलत दारास सवलत कालावधीकरीता व्यावसायिक वापरांतर्गत त्रयस्थ हितसंबंध निर्माण करण्यास तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी प्रदान केलेल्या जागेचा वापर तीन वर्षाच्या आत सुरु करण्याबाबतची अटही शिथील करण्यास ही मान्यता देण्यात आली.

अंतर्प्रेरणेचा विसर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या