25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रआज दिवसभरात महाराष्ट्रात ६३ हजार २८२ कोरोना बाधित

आज दिवसभरात महाराष्ट्रात ६३ हजार २८२ कोरोना बाधित

एकमत ऑनलाईन

मुंबई : आज शनिवारी राज्यात ६३ हजार २८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर दिवसभरात ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात २४ तासांत ६१ हजार ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ३९ लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४.२४ टक्के एवढे झालं आहे.

राज्यात २४ तासांत ८०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ६ लाख ६३ हजार ७५८ इतकी आहे.

राज्यात आत्तापर्यंत ४६,६५,७५४ जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. मात्र, त्यापैकी ३९,३०,३०२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या कोरोनाचे ६,६३,७५८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या ४०,४३,८९९ रुग्ण होम क्वारंटाईन असून, २६,४२० जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या कोविड१९ लसीकरणाचा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत शुभारंभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या