34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ७ हजार ८६३ नवीन कोरोनाबाधित वाढले

राज्यात आज ७ हजार ८६३ नवीन कोरोनाबाधित वाढले

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ७ हजार ८६३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली, तर, ५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय ६ हजार ३३२ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,३६,७९० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.८९ टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.४१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६४,२१,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६९,३३० (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५५,७८४ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ३,५५८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

 

१३ तृतीयपंथी बनले कॉन्स्टेबल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या