35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र आज शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन : भविष्यात शिवसैनिक पंतप्रधान असेल- उद्धव ठाकरे

आज शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन : भविष्यात शिवसैनिक पंतप्रधान असेल- उद्धव ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, खासदार, आमदार, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख व पदाधिकारी यांच्या समवेत संवाद साधला.

प्राण जाय पर वचन न जाये ही आमची संस्कृती

विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. प्राण जाय पर वचन न जाये ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुखसुद्धा लाचार होणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहे

तसेच भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मला काही जण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहेत, पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहेत.

राजकारण मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री

आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला, तो मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. अन्याय सहन करु नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक

शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही. जीवाची पर्वा न करता बेभान होऊन जनतेसाठी झटणारा हा शिवसैनिकच असू शकतो. वादळ येऊ दे, चक्रीवादळ येऊ दे, कोणतंही संकट येऊ दे, तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे मला कशाचीही भीती नाही. अशीच साथ सर्वांनी नेहमीच शिवसेनेसोबत द्या आणि सर्वांनी आपली काळजी घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

Read More  सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात बॉलिवूडच्या 2 अभिनेत्यांची चौकशीची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या