16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रबिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार

एकमत ऑनलाईन

मुंबई : गोरेगाव येथील आरे कॉलनी येथे आईसोबत मंदिरात जात असताना काल सकाळी साडेसहा वाजता बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले. आकस्मिक मृत्यूच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

या दीड वर्षांच्या चिमुरडीची आई दिवाळीनिमित्त दिवे लावण्यासाठी घराबाहेर पडली होती. घराला लागूनच असलेल्या एका मंदिरात या मुलीची आई चालली होती, तिच्या मागोमाग इतिकाही निघाली. सकाळी पावणे सहाच्या सुमारास बिबटयाने इतिकावर हल्ला केला आणि तिला आपल्या जबड्यात पकडून जंगलात पसार झाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या