28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रउद्या वर-वधूही लग्न होताच खेळाचा दर्जा मागतील

उद्या वर-वधूही लग्न होताच खेळाचा दर्जा मागतील

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सध्या राजकारण हा एक खेळ करुन टाकला आहे. खरंतर राजकारण गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. पण सध्याच्या सरकारच्या भाषेत सांगायचे झाले तर राजकारणाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. उद्या कोजागिरी, मंगळागौर आणि वर-वधू वरमाला घालताच द्या आता आम्हाला खेळाचा दर्जा असे म्हणतील अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या निर्णयाचा आज समाचार घेतला आहे. ते मुंबईत पक्षाच्या पदाधिका-यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते.

राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केले. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता अगं अगं म्हशी…हेच सुरू आहे. त्यामुळे निवडणुका कधी लागतील हे सांगता येत नाही. केव्हाही लागतील पण त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. राजकारणात लोकांनी यायला हवे. कारण राजकारण अतिशय गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. तुमच्या घरात नळाला येणारे पाणी महानगरपालिका ठरवते. राजकारणाला तुम्ही तुच्छ मानता. मग मतदानाच्या दिवशी दोन-दोन तास रांगेत उभे राहून मतदान का करता? त्यामुळे राजकारण म्हणजे केवळ मतदान नव्हे. जनतेने जागे होणे गरजेचे आहे. युवापीढीने राजकारणात येणे खूप महत्वाचे आहे. सरकारला जाब विचारणे गरजेचे आहे असे राज ठाकरे म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचा समाचार
राज ठाकरे यांनी यावेळी शिंदे सरकारने दहीहंडीला दिलेल्या खेळाच्या दर्जाच्या निर्णयाचा आपल्या शैलीत समाचार घेतला. राजकारण हा गांभीर्याने घेण्याचा विषय असल्याचे सांगताना राज ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या निर्णयावर भाष्य केले. राज्यात सध्या ज्यापद्धतीचे राजकारण सुरू आहे. ते पाहता नुसता खेळ मांडला आहे असेच सर्वांच्या लक्षात येईल. खरंतर राजकारण गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. पण सध्याच्या सरकारच्या भाषेत सांगायचे झाले. तर राजकारणाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. कोजागिरी, मंगळागौरलाही खेळाचा दर्जा देतील. उद्या लग्नात वरमाला गळयात पडली की खेळाचा दर्जा मागतील असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या