नाशिक : आपण सगळेजण सण उत्सव म्हटले की ते आनंदाने, उत्साहाने साजरा करतो. मात्र, सध्या कोरोनामुळे सर्व काही सध्या पद्धतीने साजरा करणे सुरू आहे. काल (१८ ऑगस्ट) बैल पोळा हा सण होता. संपूर्ण राज्यात धूमधडाक्यात साजरा केला जातो. बैलांना सजवले जाते. गोडा धोडाच जेवण केलं जाते. मात्र, काल असं काहीही झाले नाही. अगदी साध्या पद्धतीने सर्व काही पार पडले.
तसेच, पोळ्यात बैलाची सजावट करताना त्यावर राजकीय संदेश लिहिले जात आहेत. गेली काही वर्षे शेतकरी राज्य सरकार, मराठा आरक्षण यासह विविध संदेशाद्वारे नाराजी व्यक्त करीत होते. यंदांचे संदेश मात्र शेतकरी सरकारवर खुश असल्याचे होते. त्यामुळे पोळ्याचे संदेशही चर्चेचा विषय आहे.
पोळ्यात बैलांची सजावट होते. त्याला रंगीबेरंगी शिक्के लावण्याची प्रथा आहे. यंदा त्यावर संदेश लिहिले जातात. फ्लेक्स लावले जातात. नाशिकला काही शेतक-यांनी कर्जमाफीवर समाधान व्यक्त करणारे संदेश लिहिले. नाशिकच्या एका शेतक-याने `शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणजे जीवा शिवाची जोडी` असे छायाचित्रांसह बैलांच्या पाठीवर लिहिले होते. राष्ट्रवादी कॉग्रेसचे सोमनात बोराडे यांनी कोरोनामुळे शेतकरी संकटात असल्याचा संदेश लिहिला होता. असे राजकीय संदेश ठिकठिकाणी पहायला मिळाले. यापूर्वीच्या सरकारविषयीच्या कडवट प्रतिक्रीया यंदा दिसल्या नाहीत.
बॉक्सर सरिता देवीला कोरोनाची लागण; इम्फाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू