खडकवासला धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले ; १६ हजार २४७ क्वयूसेकने पाणी सोडण्यात येत आहे
पुणे : बाबा भिडे पूल पाण्याखाली गेल्याचे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली दोन दिवसांपासून खडकवासला धरण परिसरात पावसाचा चोर वाढल्यानं धरणातून नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढला आहे.
खडकवासला धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले असून १६ हजार २४७ क्वयूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. नदी पात्रालगत असलेल्या रस्त्यावर पाणी आल्याने नागरिक गाड्या धूत आहेत. तर लहान मुले पाण्यात खेळण्याचा आनंद लुटताना दिसत आहे. नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणापैकी खडकवासला एक धरण आहे.बुधवारी खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली. गुरुवारपासून पानशेत, वरसगाव, टेमघऱ आणि खडकवासला धरणात पावसाचा जोर कायम आहे.
मुलींच्या लग्नाचे किमान वय बदलण्याची शक्यता, मोदींचे संकेत